YouVersion Logo
Search Icon

मत्तय 17

17
येशूचे रुपांतर
(मार्क 9:2-13; लूका 9:28-36)
1-2मंग सहा दिवसाच्या नंतर येशूनं पतरस, याकोब अन् योहान यायले आपल्या संग घेऊन एका उंच पहाडावर एकांतात नेलं, अन् तती त्यायच्या देखत येशूचे रुपांतर झाले, अन् त्याचं तोंड सूर्या सारखं अन् त्याचे कपडे ज्योती सारखं चमकले. 3अन् त्यायले मोशे संग एलिया भविष्यवक्ता दिसला अन् ते येशू संग बोलत होते.
4तवा पतरसन येशूले म्हतलं “हे गुरुजी, आमी अती हावो हे चांगलं हाय, तरी आमी तीन मंडप बनवतो, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी, एक एलिया भविष्यवक्ता साठी.” 5जवा तो बोलूनच रायला होता, कि तवा पाहा, एका ऊजीळ वाल्या ढगायच्या सावलीनं त्यायले झाकून घेतलं, अन् त्या ढगातून हा आवाज निगाला, कि “हा माह्या आवडता पोरगा हाय, ज्याच्यावर मी खुश हाय, याच्यावालं तुमी आयका.”
6शिष्य हे आयकून जमिनीवर तोंडावर लेटले, अन् लय भेले. 7येशूने जवळ येऊन त्यायले हात लावला, अन् म्हतलं, “उठा, भेऊ नका.” 8तवा त्यायनं एकदमचं चवभवंताल पायलं, तवा येशू शिवाय त्यायले आपल्यापासी कोणीचं दिसले नाई. 9मंग येशू अन् त्याचे तीन शिष्य पहाडावरून उतरता-उतरता येशूनं त्यायले आदेश देला, की “तुमी जे पायलं हाय, ते माणसाचा पोरगा म्हणजे मी, मरणातून वापस जिवंत होय परेंत तुमी ते कोणालेच सांगू नका.”
10“यावर त्याच्या शिष्यायनं येशूले विचारलं, मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक कावून मानतात कि पयल्यानं एलिया भविष्यवक्त्याचं येणं पक्कं हाय?” 11येशूनं उत्तर देलं, “एलिया भविष्यवक्ता तर येणारच, अन् सगळं काई ठिक करणार. 12पण मी तुमाले म्हणतो कि एलिया भविष्यवक्ता आलेला हाय, पण लोकायन त्याले नाई ओयखलं पण जसं वाटलं तसं त्याच्या सोबत केलं, अशाचं प्रकारे माणसाचा पोरगा पण त्यायच्या हातातून दुख भोगीन.” 13तवा शिष्यायले वाटलं, कि त्यानं आमाले योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या बाऱ्यात म्हतलं हाय.
भुत लागलेल्या लेकराले बरं कर्ण
(मार्क 9:14-29; लूका 9:37-43)
14जवा येशू अन् त्याचे शिष्य लोकायच्या गर्दी पासी गेले, तवा एक माणूस त्याच्यापासी आला, अन् टोंगे टेकून म्हणू लागला, 15“हे गुरुजी, माह्याल्या पोरावर दया कर, कावून कि, त्याले मिर्गी येते, अन् तो लय दुख उचलते, अन् लय वेळा आगीत अन् पाण्यात पडते.
16अन् मी त्याले तुह्याल्या शिष्यापासी नेलं होतं, पण ते त्याले बरे करू शकले नाई.” 17येशूनं उत्तर देलं, “हे अविश्वासी अन् कठोर मनाचे लोकोहो मी कुठपरेंत तुमच्या संग रायणार, कुठपरेंत तुमाले वागवणार, त्या पोराले माह्यापासी आणा.” 18तवा येशूनं भुत आत्म्याले दटावून म्हतलं, त्याच्यातून निघून जा, अन् तवाच भुत आत्मा त्याच्यातून निघून गेला अन् तो पोरगा तवाच्या-तवाच बरा झाला.
19तवा शिष्यायनं एकट्यात येवून येशूले विचारलं “आमाले तो भुत आत्मा कावून त्याच्यातून बायर काढता आला नाई?” 20येशूनं त्यायले म्हतलं, “तुमच्या विश्वासाच्या कमीच्याने, मी तुमाले खरं सांगतो, कि जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या सारखा पण अशीन, तर जे कोणी या पहाडाले मनीनं, तू बुडापासून उपटून समुद्रात जा, तर तो चालला जाईन, अन् कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी असंभव नाई अशीन. 21पण हे भुत आत्मे उपास प्रार्थनेच्या द्वारेच बायर निगते.”
आपल्या मरणाच्या विषयात अजून भविष्यवाणी
(मार्क 9:30-32; लूका 9:43-45)
22-23जवा येशू अन् त्याचे शिष्य गालील प्रांतात राहून रायले होते, तवा येशूनं त्यायले म्हतलं कि, “माणसाचा पोरगा माणसाच्या हाती देला जाणार हाय, ते त्याले जीवानं मारतीन अन् मारल्या गेल्यावर तो तिसऱ्या दिवशी वापस जिवंत होईन;” यावर शिष्य लय उदास झाले.
देवळासाठी कर
24जवा येशू अन् त्याचे शिष्य कफरनहूम शहरात आले, तवा यरुशलेम देवळासाठी कर घेणाऱ्यानी पतरसच्या पासी येऊन विचारलं, कि “काय तुमचा गुरु, यरुशलेमच्या देवळाचा कर देत नाई? त्यानं म्हतलं हो देत असतो.” 25जवा पतरस घरी आला, तवा येशूने त्याले विचाराच्या पयले त्याले विचारलं, “हे शिमोन तुले काय वाटते? पृथ्वीचे राजे शुल्क किंवा करवसुली कोणापासून घेतात? आपल्या पोरापासून या दुसऱ्या लोकायपासून, पतरसने त्याले म्हतलं, दुसऱ्या लोकायपासून”
26येशूने त्याले म्हतलं, “तर पोरं वाचले, 27पण आमची इच्छा नाई कि त्यायच्यासाठी ठोकराच कारण बनावं, तरी आमी त्याले अपमानित नाई केलं पायजे, तू समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन गय टाक अन् जे मासोई पयले निगीण तिले घेशीन, अन् तिचं तोंड खोलल्यावर एक सिक्का (म्हणजे चार दिवसाची मजुरी#17:27 एक सिक्का म्हणजे चार दिवसाची मजुरी ) भेटीन, अन् त्याले घेऊन तू माह्या व तुह्या बदल्यात त्यायले देऊन देशीन.”

Currently Selected:

मत्तय 17: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in