लुका 20:23-26
लुका 20:23-26 VAHNT
तवा येशूनं त्यायचा कपट ओयखून त्यायले म्हतलं, तुमी मले कायले पारखता, “एक दिनार (एक चांदीचा सिक्का) मले दाखवा, तवा येशूनं त्यायले म्हतलं, कि ह्याच्यावर चित्र अन् नाव कोणाचं हाय?” अन् त्यायनं म्हतलं “सम्राट राजाचं.” येशूनं त्यायले म्हतलं “जे रोमी सम्राटची वस्तु हाय ते रोमी सम्राटले द्या, अन् जे देवाची वस्तु हाय ते देवाले द्या,” तवा त्यांच्या च्यानं ते लोकायच्या समोर त्याले बोलण्यात धरू नाई शकले, तर त्याच्या उत्तरावून अचंभा होऊन चुपचाप रायले.