YouVersion Logo
Search Icon

नीति. 25

25
नीतिसूस्त्रांची तत्त्वे आणि काही तुलना
1ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली.
2काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे,
पण त्या गोष्टी शोधून काढणे यामध्ये राजाचे गौरव आहे.
3जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा,
तसे राजाचे मन गूढ आहे.
4रुप्यातला गाळ काढून टाक,
आणि धातू कामगार रुप्याचा उपयोग त्याच्या कामासाठी करू शकेल.
5त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर
म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल.
6राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको.
आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको.
7कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे
तुझा पाणउतारा करण्यापेक्षा,
“वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे.
8फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको.
ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले
तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.
9तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव,
आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको.
10केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील,
व हे दूषण तुला लागून राहील.
11जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद,
तसे निवडक चांगले शब्द बोलणे.
12जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात,
तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे.
13कापणीच्या समयी#उन्हाळ्यात जसे बर्फाचे पेय,
तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे
कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
14जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत,
ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.
15धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते,
आणि मऊ जीभ हाड फोडते.
16जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा;
जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील.
17शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका,
जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल.
18जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो.
जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.
19संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे,
हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे.
20जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो,
तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा,
आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे.
21तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे
आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे;
22असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील,
आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल.
23उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो;
त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो.
24भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा,
धाब्याच्या कोपऱ्यात राहाणे अधिक चांगले आहे.
25तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी,
तसे दूर देशातून आलेले चांगले वर्तमान आहे.
26जसा घाणेरडा झालेला झरा किंवा नासलेले कारंजे,
तसा दुष्टाच्यासमोर भ्रष्ट झालेला नीतिमान आहे.
27खूप मध खाणे चांगले नाही,
सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे.
28जर मनुष्य स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल,
तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.

Currently Selected:

नीति. 25: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in