YouVersion Logo
Search Icon

गण. 8

8
अहरोन दिवे उजळतो
निर्ग. 25:31-40
1परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 2“अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”
3अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने दीपस्तंभावरील दिव्यांचा उजेड समोर पडावा म्हणून दिवे लावले. 4दीपस्तंभ याप्रमाणे बनवलेला होताः परमेश्वराने मोशेला दीपस्तंभाच्या तळापासून त्याच्या कळ्यापर्यंत दाखविल्याप्रमाणे त्याने तो घडीव सोन्याचा घडविला.
लेव्यांचे समर्पण
5पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 6लेवींना इस्राएल लोकांमधून घे व त्यांना शुद्ध कर.
7त्यांना शुद्ध करण्यासाठी हे करः पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे. 8मग त्यांनी एक गोऱ्हा घ्यावा आणि तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण घ्यावे. त्यांनी पापार्पणासाठी दुसरा एक गोऱ्हा घ्यावा.
9लेवींना दर्शनमंडपासमोर सादर कर व इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव. 10लेवींना परमेश्वरासमोर सादर कर. तेव्हा इस्राएल लोकांनी लेवींच्या डोक्यावर आपले हात ठेवावे. 11अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे.
12लेवींनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे. लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल पापार्पण व दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा. 13लेवींना अहरोन व त्याचे पुत्र ह्यांच्या समोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे.
14याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांना वेगळे करा. लेवी माझेच होतील. 15तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपामध्ये जाऊन सेवा करावी.
16हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे. 17इस्राएल लोकांतले, मनुष्यापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले.
18मी इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे. 19अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.
20तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांची मंडळी ह्यांनी ह्याप्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले. इस्राएलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले. 21लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
22त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले.
लेव्यांच्या सेवेची मुदत
23पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, 24जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा.
25त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षांपासून सेवेत याप्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे. 26त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.

Currently Selected:

गण. 8: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for गण. 8