YouVersion Logo
Search Icon

यहो. 15

15
यहूदाला देण्यात आलेला प्रदेश
1यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे. 2आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली. 3ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे. 4आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी. 5आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे. 6मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली; 7मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो. 8मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली. 9मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली, 10मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली. 11मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता. 12आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
कालेब हा हेब्रोन व दबीर ही नगरे हस्तगत करतो
शास्ते 1:11-15
13आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता. 14मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले. 15नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते. 16तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन. 17तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.” 18आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? 19अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
यहूदाला मिळालेली नगरे
20यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे; 21यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर; 22कीना व दीमोना व अदादा; 23आणि केदेश व हासोर व इथनान; 24जीफ, टेलेम व बालोथ; 25हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत) 26अमाम व शमा व मोलादा; 27आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट; 28आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा; 29बाला, ईयीम व असेम; 30आणि एल्तोलाद व कसील व हर्मा; 31आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना; 32आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे. 33तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा; 34जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम; 35यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका; 36आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे; 37सनान व हदाशा व मिग्दल-गाद; 38दिलन, मिस्पा व यकथेल; 39लाखीश व बसकाथ व एग्लोन; 40कब्बोन व लहमाम व किथलीश; 41गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे. 42लिब्ना व एथेर व आशान; 43इफ्ताह व अष्णा व नजीब; 44आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे. 45एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे; 46एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह. 47अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे. 48आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो; 49दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर; 50अनाब व एष्टमो व अनीम, 51आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी, 52अरब व दूमा व एशान, 53यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका, 54हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी. 55मावोन, कर्मेल व जीफ व यूटा, 56इज्रेल व यकदाम व जानोहा, 57काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी. 58हल्हूल, बेथ-सूर व गदोर, 59माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी. 60किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी. 61रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा; 62आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी. 63तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.

Currently Selected:

यहो. 15: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in