YouVersion Logo
Search Icon

यश. 65

65
बंडखोरांना शासन
1ज्यांनी विचारले नाही, त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो.
ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा नाही केला, त्यांना मी म्हणालो, मी इथे आहे! मी इथे आहे!
2मी पूर्ण दिवस आपला हात त्या लोकांसाठी पसरला जे हट्टी आहेत,
जे चांगल्या मार्गाने चालत नाहीत, जे आपल्याच कल्पना योजतात आणि आपल्याच विचारांच्या मागे चालतात.
3ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात,
ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात.
4ते कबरींमध्ये बसून रात्रभर पहातात,
आणि डुकराचे मांस खातात व त्यांच्या पात्रांत ओंगळ मासाचा रस्सा असतो.
5तरी ते असे म्हणतात, ‘दुर उभा राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे.
या गोष्टी माझ्या नाकात जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत, अशी अग्नी जी सतत जळत राहते.
6“पाहा, हे माझ्या समोर लिहीले आहे,
मी गप्प बसणार नाही, पण त्यांना परत फेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईन.”
7“त्यांची पापे आणि त्यांच्या वडिलांची पापे मी त्यांच्या पदरी भरून देईन.” परमेश्वर असे म्हणतो.
“पर्वतांवर धूप जाळण्याबद्दल आणि टेकड्यांवर माझी थट्टा केल्या बद्दल मी त्यांना त्याची परत फेड करीन.
मी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून देईन.”
8परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घडांत जेव्हा रस आढळतो,
तेव्हा कोणी म्हणते, त्याचा नाश करू नका, कारण त्यामध्ये काही चांगले आहे.”
मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही.
9मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन.
माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील.
10मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल.
या सर्व गोष्टी, ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील.
11“पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता.
12पण मी तुम्हास तलवारीसाठी नेमले आहे, आणि तुम्ही सर्व वधण्यासाठी वाकवले जाल,
कारण मी जेव्हा बोलाविले, तुम्ही उत्तर दिले नाही, जेव्हा मी बोललो, तुम्ही ऐकले नाही;
त्याऐवजी तुम्ही माझ्या नजरेत जे वाईट ते केले, आणि मला आवडत नसलेल्या गोष्टी करण्याची तुम्ही निवड केली.”
13तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही भुकेले रहाल.
माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले रहाल.”
माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.
14माझ्या सेवकांच्या हृदयांत आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील.
पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, आणि आत्म्याच्या भंगाने तुम्ही आक्रंदन कराल.
15तुम्ही तुमची नावे माझ्या निवडलेल्यांसाठी बोलावे म्हणून शाप अशी ठेवून जाणार. मी, प्रभू परमेश्वर, तुम्हास ठार मारील.
मी माझ्या सेवकांना नव्या नावाने बोलावील.
16जो कोणी पृथ्वीवर आपणाला आशीर्वाद देईल, तो सत्याच्या देवाच्या ठायी स्वत:ला आशीर्वाद देईल.
जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो, तो सत्याच्या देवाची शपथ वाहील.
कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत.
नवे आकाश व नवी पृथ्वी
17कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार,
आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही.
18पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदासर्वकाळ आनंद व उल्लास कराल. पाहा! मी यरूशलेमेला हर्ष आणि तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणीन.
19“मी यरूशलेमविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन सुखी होईन.”
तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही.
20तिच्या मध्ये काही दिवस जगेल असे तान्हे बाळ,
किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही. जो शंभर वर्षांचा होऊन मरण पावला, तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल.
शंभर वर्षात मरण पावलेला एक पापी मनुष्य शाप समजला जाईल.
21“ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.”
22एकाने घर बांधायचे व त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्षमळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही.
कारण झाडाच्या दिवसांप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
23ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत.
कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत.
24त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन.
25लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल.
पण धूळ ही सापाचे अन्न होईल.
माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.

Currently Selected:

यश. 65: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in