YouVersion Logo
Search Icon

यश. 36

36
सन्हेरीबाची स्वारी
2 राजे 18:13-37; 2 इति. 32:1-19
1हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर हल्ला केला, आणि त्यांचा ताबा घेतला. 2नंतर अश्शूरच्या राजाने रब-शाके#अर्थ-सेनाधिपती याला आपल्या मोठ्या सैन्यासह लाखीशाहून यरूशलेमेमध्ये हिज्कीया राजाकडे पाठवले, तो वरच्या तळ्याच्या नळाजवळ परटाच्या शेताच्या रस्त्यावर येऊन पोहचला, आणि उभा राहीला. 3मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, घरावरचा कारभारी व शेबना चिटणीस व आसाफचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे त्याच्याकडे भेटण्यास गेले.
4रब-शाके त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीयाला सांगा, अश्शूरचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्त्रोत काय आहे? 5तेथे युद्धासाठी मसलत आणि सामर्थ्य आहे, असे सांगून, तू फक्त निरर्थक शब्द बोलतो, आता तू कोणावर विश्वास ठेवतो? माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोण धैर्य देतो?
6पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.” 7पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्यांवर भरवसा ठेवतो, तर हिज्कीयाने ज्यांची उच्चस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहूदाला आणि यरूशलेमेला म्हटले, “तुम्ही यरूशलेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही?”
8तर आता मी माझा धनी अश्शूरचा राजा याच्यापासून एक चांगला प्रस्ताव तुझ्याशी करण्याची इच्छा आहे, मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तू त्यांच्यासाठी घोडेस्वार शोधण्यास समर्थ असलास तर.
9माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरवसा मिसरावर ठेवता? 10तर आता, मी येथपर्यंत प्रवास करून आलो, ते या देशाविरूद्ध लढण्यास आणि नाश करण्यास, ते परमेश्वराशिवाय काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर हल्ला कर आणि त्यांचा नाश कर.
11मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम आणि शेबना व यवाह हे रब-शाकेला म्हणाले, “कृपया आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल, कारण ती आम्हास समजते. कोटावरील लोकांस तुमचे बोलणे समजेल म्हणून तुम्ही आमच्याशी यहूदी भाषेत#इब्री बोलू नका.” 12पण रब-शाके म्हणाला “माझ्या धन्याने, मला तुझ्या धन्याशी व तुजशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोटावर बसलेल्या मनुष्यांनी तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय?”
13नंतर रब-शाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहूदी भाषेत#इब्री म्हणाला, “महान राजा, अश्शूरचा राजा याचे शब्द ऐका.” 14राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही. 15परमेश्वर आम्हास खात्रीने सोडवील; हे नगर अश्शूर राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे बोलून हिज्कीयाने तुम्हास परमेश्वरावर भरवसा ठेवायला लावू नये.”
16हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा असे म्हणतोः माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या, नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या टाकीतले पाणी प्या. 17मी येईन आणि जो देश तुमच्या स्वतःच्या देशासारखा आहे, धान्याचा व नव्या द्राक्षरसाचा देश, भाकरीचा व द्राक्षमळ्याचा देश, त्यामध्ये मी तुम्हास नेईपर्यंत तुम्ही असे करा.
18परमेश्वर आपल्याला सोडवील असे सांगून हिज्कीयाने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये. अश्शूर राज्याच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवाने आपल्या लोकांस सोडवीले आहे काय? 19हमाथ आणि अर्पद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोनाला माझ्या सामर्थ्यापासून सोडविले काय? 20ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे, असे या देशांच्या सर्व देवांपैकी कोण आहेत, तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम सोडवील काय?
21पण लोक शांत राहीले, आणि त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यास उत्तर देऊ नका अशी राजाची आज्ञा होती. 22नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.

Currently Selected:

यश. 36: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in