YouVersion Logo
Search Icon

यहे. 24

24
कढईचा दाखला
यिर्म. 1:13-19
1बाबेलातील बंदिवासाच्या नवव्या वर्षी पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणाला, 2“मानवाच्या मुला, तुझ्यासाठी आजचा दिवस आणि तारीख लिहून ठेव, याच दिवशी बाबेलचा राजा येऊन यरूशलेमेला वेढा देईल.
3आणि या फितुर घराण्या विरुध्द म्हणी बोल, दाखले देऊन सांग, प्रभू परमेश्वर देव असे सांगत आहे. एक जेवण शिजवण्याचे भांडे घे व त्यामध्ये पाणी ओत.
4मांडी व खांद्याचे तुकडे, अन्नांचे तुकडे त्यामध्ये गोळा कर, त्यामध्ये हाडे टाकून भरणा कर.
5कळपातले चांगले कोकरु घे, हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांचा जाळ कर, त्यांना चांगले शिजू दे त्यातील हाडांनाही शिजू दे.
6यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहे, या रक्तपाती शहराचा निषेध असो, ती गंज चढलेल्या भांड्यासारखी आहे; त्याचा गंज निघत नाही, त्याच्या तुकड्यातून तुकडा काढून त्यातून काही निघत नाही.
7तिने सर्वांच्यामध्ये रक्तपात केला तिने गुळगुळीत खडकावर रक्त सांडले जमिनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही. 8म्हणून संतापाच्या त्वेषाने मी तिचे रक्त खडकावर सांडले जमीनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही.
9यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहेः या रक्तपाती शहराचा निषेध असो, मी जळणासाठी लाकडाचा मोठा साठा करीन. 10लाकडाचा साठा वाढवा, आग जाळा, मांस शिजवा या ऋतूत रस्सा चांगला बनव, हाडेही भाजू देत.
11मग अग्नीवर भांडे रिकामेच असू दे अशासाठी की त्यातील गाळ तप्त अग्नीने जळून जाईल. 12ती कष्टाने खूप कामाने थकली भागली होती, पण अग्नीने तिची झिज झाली होती.
13तुझा लज्जास्पद स्वभाव हा तुझ्या अशुद्धतेत आहे, कारण मी तुला शुद्ध करु पाहिले तरी पण तू शुद्ध झालीच नाही व अशुद्धच राहिल्याने माझा त्वेष तुझ्यावर आला आहे.
14मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईन, तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
यहेज्केलाच्या पत्नीचा मृत्यू
15मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, 16मानवाच्या मुला पाहा! तुझ्या डोळ्यांना जे उत्तम वाटते ते तुझ्यापासून मी काढून घेईन, तरी तू दुःख करु नये व आसवेही गाळू नये व आपली वाहने फाडू नयेत. 17तू मुकाट्याने खेद व्यक्त कर मृतांसाठी दुःख व्यक्त करु नको, आपल्या डोक्यात फेटा राहू दे, व पायात जोडा घाल आपले तोंड झाकू नको दुःखाच्या समयी पत्नीच्या मुत्युनंतर जे पुरुष अन्न पाठवतात ते खाऊ नको.”
18मग पहाटे मी माझ्या लोकांशी बोललो आणि माझी पत्नी सायंकाळी वारली. तेव्हा मला जी आज्ञा झाली तसे मी सकाळी पालन केले.
19लोकांनी मला विचारले, “तू आम्हास याचा अर्थ काय हे सांगणार नाहीस जे काही तू करत आहेस ते?” 20मग मी त्यांना म्हणालो, परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 21इस्राएलाच्या घराण्याला सांग, परमेश्वर देव असे सांगत आहे पाहा! घमंड तुझी ताकत झाली आहे तुझ्या डोळ्यांना जे बरे वाटते ते तुझ्या जीवाच्या वासनेने माझे पवित्रस्थान विटाळले आहे! आणि जी तुझी मुले व ज्या तुझ्या मुली मागे उरलेल्या होत्या त्या तलवारीने खाली पडल्या आहेत.
22मग मी जे केले तेच तुम्ही कराल; तू आपले तोंड खाली घालणार नाही, दुःखाच्या समयी लोक देतात ती खावयाची भाकर खाणार नाही. 23त्यापेक्षा आपल्या डोक्यात फेटा आणि पायात जोडा घाला तू खेद व आसवे गाळणार नाहीस, तुझ्या अपराधासाठी वितळले जाशील प्रत्येक त्यांच्या भावंडासाठी विव्हळ होईल. 24मग यहेज्केल तुम्हास चिन्ह होईल जे काही त्याने केले तेच तुम्ही कराल हे जेव्हा होईल तेव्हा तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे. 25“पण तू मानवाच्या मुला, ज्या दिवशी त्यांच्यापासून त्यांचा आश्रय ताब्यात घेतला, जो त्यांचा आनंद, गर्व जो त्यांनी पाहिला व ज्याची इच्छा त्यांनी केली जेव्हा मी त्यांच्या मुलामुलींना त्यांच्या पासून घेऊन गेलो. 26त्या दिवशी शरणार्थी येतील व तुला बातमी देतील. 27त्या दिवशी शरणार्थी व निभावलेले येतील आणि ते तुला सांगतील तू आता फार काळ गप्प रहाणार नाही, असा तू चिन्ह होशील म्हणजे, त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”

Currently Selected:

यहे. 24: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in