1 इति. 2
2
इस्त्राएलाचे पुत्र
उत्प. 35:23-26; 46:8-25
1ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून, 2दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
यहूदाचे वंशज
रूथ 4:18-22; मत्त. 1:2-6; लूक 3:31-33
3एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले. 4यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.
5हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते. 6जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा. 7जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध#त्याने देवाला समर्पित केलेली लूट ठेवून इस्राएली लोकांवर आपत्ती आणली. यहोशवा अध्याय 7 पाहा केला आणि इस्राएलांवर संकटे आणली. 8एथानाचा पुत्र अजऱ्या होता.
9यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते. 10अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता. 11नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र. 12बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.
13इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा, 14चौथा नथनेल, पाचवा रद्दाय, 15सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
16सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते. 17अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.
18हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र. 19अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर. 20हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल.
21नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला. 22सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
23पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती. 24हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.
25यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती. 26यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती. 27यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत. 28शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.
29अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले. 30सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला. 31अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय. 32शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला. 33पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.
34शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा. 35शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
36अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला. 37जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला. 38ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.
39अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला. 40एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला. 41शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.
42यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन. 43कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र. 44शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय.
45शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता. 46कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता. 47रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र.
48माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली. 49तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
50ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल, 51बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.
52किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक, 53आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
54सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक. 55शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.
Currently Selected:
1 इति. 2: IRVMar
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.