नीतिसूत्रे 8:22-31
नीतिसूत्रे 8:22-31 MARVBSI
परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य, असे मला निर्माण केले. अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले; त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाशे स्थापली तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली; जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले; जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली; जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले; तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.



![[How Firm a Foundation] Creation नीतिसूत्रे 8:22-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2Fhttps%3A%2F%2Fs3.amazonaws.com%2Fyvplans%2F53360%2F1440x810.jpg&w=3840&q=75)

