YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 8:1-7

नीतिसूत्रे 8:1-7 MARVBSI

ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, चवाठ्यांवर ते उभे असते; ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, “मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे.