YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 1:1-4

नीतिसूत्रे 1:1-4 MARVBSI

इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे : ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे; सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत. भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे