YouVersion Logo
Search Icon

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8 MARVBSI

प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.