पण तुमना मधून असा नई होवाव, पण जो कोणी तुमना मा मोठा होवाना देखस, तो तुमना दास बनाले पाहिजे. आणि जो कोणी तुमना मा पहिला होवानी ईच्छा ठेवस त तो सर्वास्ना दास बनो. जसा कि माणुस ना पोऱ्या, दुसरास्नी चाकरी करासाठे या दुनिया मा उना. मी एनासाठे नई उना कि दुसरा मनी चाकरी करो आणि मी किईक लोकस्ले तेस्ना पाप शी सोळावा साठे मराले एयेल होता.