1
मार्क 10:45
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
Compare
Explore मार्क 10:45
2
मार्क 10:27
येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही; परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”
Explore मार्क 10:27
3
मार्क 10:52
येशू म्हणाले, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि तो रस्त्याने येशूंच्या मागे चालू लागला.
Explore मार्क 10:52
4
मार्क 10:9
म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”
Explore मार्क 10:9
5
मार्क 10:21
येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. “तू एका गोष्टीत उणा आहेस,” तो म्हणाला. जा, “तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”
Explore मार्क 10:21
6
मार्क 10:51
“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” येशूंनी त्याला विचारले. आंधळा मनुष्य म्हणाला, “गुरुजी मला दृष्टी यावी.”
Explore मार्क 10:51
7
मार्क 10:43
पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.
Explore मार्क 10:43
8
मार्क 10:15
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.”
Explore मार्क 10:15
9
मार्क 10:31
पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”
Explore मार्क 10:31
10
मार्क 10:6-8
परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले. ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, आणि ते दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत.
Explore मार्क 10:6-8
Home
Bible
Plans
Videos