1
मत्तय 28:19-20
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”
Compare
Explore मत्तय 28:19-20
2
मत्तय 28:18
मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे.
Explore मत्तय 28:18
3
मत्तय 28:5-6
देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे. ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा.
Explore मत्तय 28:5-6
4
मत्तय 28:10
मग येशू त्यांना म्हणाले, “भिऊ नका. माझ्या भावांकडे जा, त्यांना सांगा आणि मला भेटण्यासाठी ताबडतोब गालीलात या. तिथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”
Explore मत्तय 28:10
5
मत्तय 28:12-15
यहूदी पुढार्यांची सभा बोलाविण्यात आली. त्या सभेत शिपायांना लाच देऊन, त्यांना असे सांगावयास लावले, “रात्री आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी येऊन त्यांचे शरीर पळवून नेले. राज्यपालांना हे समजले तर भिण्याचे काही कारण नाही. आम्ही तुमच्यावतीने बोलू. सर्वकाही ठीक होईल.” या आश्वासनानंतर शिपायांनी लाच घेतली आणि त्यांना शिकविल्याप्रमाणे त्यांनी सांगितले आणि ही गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरली आणि ती आजही प्रचलित आहे.
Explore मत्तय 28:12-15
Home
Bible
Plans
Videos