1
रोमकरांना 6:23
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.
Compare
Explore रोमकरांना 6:23
2
रोमकरांना 6:14
तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पापाने तुमच्यावर सत्ता चालविता कामा नये.
Explore रोमकरांना 6:14
3
रोमकरांना 6:4
तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो, ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही उठून नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.
Explore रोमकरांना 6:4
4
रोमकरांना 6:13
तुम्ही यापुढे तुमचे अवयव दुष्टपणाची साधने म्हणून वापरू नका, परंतु तुमचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून देवाला अर्पण करा कारण तुम्हाला मरणातून जीवनाकडे आणण्यात आले आहे.
Explore रोमकरांना 6:13
5
रोमकरांना 6:6
हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाची गुलामी पत्करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला
Explore रोमकरांना 6:6
6
रोमकरांना 6:11
तर मग तसे तुम्हीही स्वतःस ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना.
Explore रोमकरांना 6:11
7
रोमकरांना 6:1-2
तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? मुळीच नाही! जे आपण पापाला मेलो ते ह्यापुढे त्यात कसे राहणार?
Explore रोमकरांना 6:1-2
8
रोमकरांना 6:16
ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात,हे तुम्हांला ठाऊक नाही काय? ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे तुम्ही गुलाम आहात किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात?
Explore रोमकरांना 6:16
9
रोमकरांना 6:17-18
तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे, तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाला धन्यवाद!
Explore रोमकरांना 6:17-18
Home
Bible
Plans
Videos