देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही: जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, मत्सर, राग, भांडणतंटे, फुटिरता, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते, तेच आता सांगतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.