1
कलस्सैकरांना 3:13
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करावयास हवी.
Compare
Explore कलस्सैकरांना 3:13
2
कलस्सैकरांना 3:2
वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका
Explore कलस्सैकरांना 3:2
3
कलस्सैकरांना 3:23
जे काही तुम्ही करता, ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून मनापासून करा.
Explore कलस्सैकरांना 3:23
4
कलस्सैकरांना 3:12
तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणा, चांगुलपणा, लीनता, सौम्यता व सहनशीलता हे सारे धारण करा.
Explore कलस्सैकरांना 3:12
5
कलस्सैकरांना 3:16-17
ख्रिस्ताचा संदेश त्याच्या समृद्धीसह तुमच्या अंतःकरणामध्ये राहो. परस्परांस सर्व सुज्ञतेने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, भक्तिगीते व आध्यात्मिक गायने कृतज्ञतेने गा. म्हणजेच शद्बात व कृतीत, जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देवपित्याचे आभार माना.
Explore कलस्सैकरांना 3:16-17
6
कलस्सैकरांना 3:14
सर्वोच्च म्हणजे ह्या सर्वांना एकसूत्रित करून परिपूर्ण करणारी प्रीती धारण करा.
Explore कलस्सैकरांना 3:14
7
कलस्सैकरांना 3:1
तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.
Explore कलस्सैकरांना 3:1
8
कलस्सैकरांना 3:15
ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरता तुम्हांला एक शरीर म्हणून बोलावण्यात आले आहे, म्हणून तुम्ही कृतज्ञ असा.
Explore कलस्सैकरांना 3:15
9
कलस्सैकरांना 3:5
तर मग पृथ्वीवरील तुमच्या दैहिक वासना म्हणजे लैंगिक अनैतिकता, अमंगळपणा, कामवासना, दुष्ट प्रवृत्ती व लोभम्हणजेच एक प्रकारची मूर्तिपूजा, ह्यांना मूठमाती द्या.
Explore कलस्सैकरांना 3:5
10
कलस्सैकरांना 3:3
कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.
Explore कलस्सैकरांना 3:3
11
कलस्सैकरांना 3:8
परंतु आता राग, क्रोध, व द्वेषभावना यांचा नायनाट करा. निंदा व शिवीगाळ करणे ह्या गोष्टी तुमच्या मुखापासून दूर राहोत.
Explore कलस्सैकरांना 3:8
12
कलस्सैकरांना 3:9-10
एकमेकांशी खोटे बोलू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या सवयींसह काढून टाकले आहे. ज्याला त्याचा निर्माणकर्ता देव त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे सातत्याने नवीन करीत आहे, असा नवा मनुष्य तुम्ही धारण केला आहे. ज्यामुळे तुम्हांला त्याचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे.
Explore कलस्सैकरांना 3:9-10
13
कलस्सैकरांना 3:19
पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींवर प्रीती करा व त्यांच्याशी निष्ठुरतेने वागू नका.
Explore कलस्सैकरांना 3:19
14
कलस्सैकरांना 3:20
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला आवडते.
Explore कलस्सैकरांना 3:20
15
कलस्सैकरांना 3:18
पत्नींनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन असा.
Explore कलस्सैकरांना 3:18
Home
Bible
Plans
Videos