तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.” फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?”
त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले.