1
2 पेत्र 2:9
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.
Compare
Explore 2 पेत्र 2:9
2
2 पेत्र 2:21-22
नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते. ‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व ‘अंग धुतल्यानंतर चिखलात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशा ज्या म्हणी आहेत त्यांच्यासारखी त्यांची गत झालेली असते.
Explore 2 पेत्र 2:21-22
3
2 पेत्र 2:19
हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः मात्र भ्रष्टतेचे दास असतात कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो, त्याचा तो दासही बनतो.
Explore 2 पेत्र 2:19
4
2 पेत्र 2:20
प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जे पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले. त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झालेली असते.
Explore 2 पेत्र 2:20
5
2 पेत्र 2:1
पूर्वीच्या काळी खोटे संदेष्टे होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक निर्माण होतील, ते विध्वंसक, असत्य मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले, त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील.
Explore 2 पेत्र 2:1
Home
Bible
Plans
Videos