1
1 पेत्र 3:15-16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना आणि तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व सौजन्यपूर्वक द्या. तुमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ असू द्या म्हणजे तुमच्याविरुद्ध बोलणे चाललेले असता ख्रिस्तावरील तुमच्या एकनिष्ठेमुळे तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांना लज्जित व्हावे लागेल.
Compare
Explore 1 पेत्र 3:15-16
2
1 पेत्र 3:12
कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. मात्र वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते.
Explore 1 पेत्र 3:12
3
1 पेत्र 3:3-4
तुमचे सौंदर्य केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोषाख करणे असे बाहेरून दिसणारे नसावे, उलट तुमचे सौंदर्य आंतरिक स्वरूपाचे म्हणजे कालातीत सौम्य व शांत वृत्ती निर्माण करणारे असावे. हे देवाच्या दृष्टीने अतिमूल्यवान असते.
Explore 1 पेत्र 3:3-4
4
1 पेत्र 3:10-11
कारण, जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावेत, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व खोटारडेपणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.
Explore 1 पेत्र 3:10-11
5
1 पेत्र 3:8-9
शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम जपणारे, कनवाळू व नम्र वृत्तीचे व्हा. वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.
Explore 1 पेत्र 3:8-9
6
1 पेत्र 3:13
तुम्ही चांगले करण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्हांला कोण इजा करणार?
Explore 1 पेत्र 3:13
7
1 पेत्र 3:11
त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.
Explore 1 पेत्र 3:11
8
1 पेत्र 3:17
चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे, अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.
Explore 1 पेत्र 3:17
Home
Bible
Plans
Videos