1
1 योहान 3:18
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा बोलण्याने नव्हे, तर आपण कृतीने खरी प्रीती करावी.
Compare
Explore 1 योहान 3:18
2
1 योहान 3:16
ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, ह्यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे.
Explore 1 योहान 3:16
3
1 योहान 3:1
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला प्रीती हे केवढे दान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने देवाला ओळखले नाही.
Explore 1 योहान 3:1
4
1 योहान 3:8
पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
Explore 1 योहान 3:8
5
1 योहान 3:9
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे.
Explore 1 योहान 3:9
6
1 योहान 3:17
स्वतःजवळ ऐहिक धन असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहणार?
Explore 1 योहान 3:17
7
1 योहान 3:24
त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहतो व तो त्या माणसामध्ये राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्यामध्ये राहतो.
Explore 1 योहान 3:24
8
1 योहान 3:10
ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही, तो देवाचा नाही आणि जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.
Explore 1 योहान 3:10
9
1 योहान 3:11
जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी.
Explore 1 योहान 3:11
10
1 योहान 3:13
बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका.
Explore 1 योहान 3:13
Home
Bible
Plans
Videos