1
लूक 14:26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
“जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
Compare
Explore लूक 14:26
2
लूक 14:27
जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
Explore लूक 14:27
3
लूक 14:11
कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
Explore लूक 14:11
4
लूक 14:33
त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.
Explore लूक 14:33
5
लूक 14:28-30
जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही!
Explore लूक 14:28-30
6
लूक 14:13-14
पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
Explore लूक 14:13-14
7
लूक 14:34-35
मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल? ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
Explore लूक 14:34-35
Home
Bible
Plans
Videos