आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले आहे, आकाशाचे माप आपल्या वतीने,
पृथ्वीवरची धूळ पाटीत धरली, डोंगराचे वजन तागडीत
किंवा टेकड्या तराजूत तोलल्या आहेत?
परमेश्वराचे मन कोणाला समजले आहे किंवा त्याचा सल्लागार म्हणून कोणी सूचना दिल्या आहेत?
त्याने कोणापासून कधी सूचना स्विकारली? कोणी त्यास योग्य गोष्टी करण्याचा मार्ग शिकवला,
आणि त्यास कोणी ज्ञान शिकवले किंवा सुज्ञतेचा मार्ग दाखवला?