1
1 करिं. 15:58
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
Compare
Explore 1 करिं. 15:58
2
1 करिं. 15:57
पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो!
Explore 1 करिं. 15:57
3
1 करिं. 15:33
फसू नका, “वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात.”
Explore 1 करिं. 15:33
4
1 करिं. 15:10
पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी आहे आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
Explore 1 करिं. 15:10
5
1 करिं. 15:55-56
“अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते.
Explore 1 करिं. 15:55-56
6
1 करिं. 15:51-52
पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.
Explore 1 करिं. 15:51-52
7
1 करिं. 15:21-22
कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील.
Explore 1 करिं. 15:21-22
8
1 करिं. 15:53
कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे.
Explore 1 करिं. 15:53
9
1 करिं. 15:25-26
कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू मृत्यू तो नष्ट केला जाईल.
Explore 1 करिं. 15:25-26
Home
Bible
Plans
Videos