1
रोमकरांस पत्र 1:16
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.
Compare
Explore रोमकरांस पत्र 1:16
2
रोमकरांस पत्र 1:17
कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे.
Explore रोमकरांस पत्र 1:17
3
रोमकरांस पत्र 1:20
कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.
Explore रोमकरांस पत्र 1:20
4
रोमकरांस पत्र 1:21
देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.
Explore रोमकरांस पत्र 1:21
5
रोमकरांस पत्र 1:25
त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन.
Explore रोमकरांस पत्र 1:25
6
रोमकरांस पत्र 1:18
वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
Explore रोमकरांस पत्र 1:18
7
रोमकरांस पत्र 1:26-28
ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
Explore रोमकरांस पत्र 1:26-28
8
रोमकरांस पत्र 1:22-23
स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली.
Explore रोमकरांस पत्र 1:22-23
Home
Bible
Plans
Videos