1
प्रकटी 16:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
(“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य!”)
Compare
Explore प्रकटी 16:15
2
प्रकटी 16:12
सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’
Explore प्रकटी 16:12
3
प्रकटी 16:14
ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.
Explore प्रकटी 16:14
4
प्रकटी 16:13
नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले.
Explore प्रकटी 16:13
5
प्रकटी 16:9
माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
Explore प्रकटी 16:9
6
प्रकटी 16:2
तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’
Explore प्रकटी 16:2
7
प्रकटी 16:16
त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.
Explore प्रकटी 16:16
Home
Bible
Plans
Videos