1
स्तोत्रसंहिता 103:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस
Compare
Explore स्तोत्रसंहिता 103:2
2
स्तोत्रसंहिता 103:3-5
तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते.
Explore स्तोत्रसंहिता 103:3-5
3
स्तोत्रसंहिता 103:1
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
Explore स्तोत्रसंहिता 103:1
4
स्तोत्रसंहिता 103:13
जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्यांवर ममता करतो.
Explore स्तोत्रसंहिता 103:13
5
स्तोत्रसंहिता 103:12
पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 103:12
6
स्तोत्रसंहिता 103:8
परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.
Explore स्तोत्रसंहिता 103:8
7
स्तोत्रसंहिता 103:10-11
आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्यांवर विपुल आहे.
Explore स्तोत्रसंहिता 103:10-11
8
स्तोत्रसंहिता 103:19
परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.
Explore स्तोत्रसंहिता 103:19
Home
Bible
Plans
Videos