परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.
त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे : ‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’