1
यशया 49:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.
Compare
Explore यशया 49:15
2
यशया 49:16
पाहा, मी तुला आपल्या तळहातांवर कोरून ठेवले आहे; तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत.
Explore यशया 49:16
3
यशया 49:25
परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.
Explore यशया 49:25
4
यशया 49:6
तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”
Explore यशया 49:6
5
यशया 49:13
हे आकाशा जयजयकार कर; हे पृथ्वी, आनंद कर; अहो पर्वतांनो, जयघोष करा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे.
Explore यशया 49:13
Home
Bible
Plans
Videos