1
यशया 43:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.
Compare
Explore यशया 43:19
2
यशया 43:2
तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.
Explore यशया 43:2
3
यशया 43:18
“पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका.
Explore यशया 43:18
4
यशया 43:1
तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.
Explore यशया 43:1
5
यशया 43:4
तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.
Explore यशया 43:4
6
यशया 43:3
कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.
Explore यशया 43:3
7
यशया 43:5
भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी तुझा वंश उगवतीकडून आणीन; मावळतीकडून तुला मी एकत्र करीन.
Explore यशया 43:5
8
यशया 43:25
मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.
Explore यशया 43:25
9
यशया 43:10
परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हांला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस.
Explore यशया 43:10
10
यशया 43:11
मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.
Explore यशया 43:11
11
यशया 43:13
“येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”
Explore यशया 43:13
12
यशया 43:20-21
वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार; मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.
Explore यशया 43:20-21
13
यशया 43:6-7
मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या; ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले त्या सर्वांना घेऊन या.”
Explore यशया 43:6-7
14
यशया 43:16-17
जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करतो, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर ह्यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, त्यांच्याने उठवत नाही, ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत, असा जो परमेश्वर तो म्हणतो की
Explore यशया 43:16-17
15
यशया 43:15
मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे; मी इस्राएलाचा उत्पन्नकर्ता, तुमचा राजा आहे.”
Explore यशया 43:15
Home
Bible
Plans
Videos