1
यशया 41:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.
Compare
Explore यशया 41:10
2
यशया 41:13
कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”
Explore यशया 41:13
3
यशया 41:11
पाहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील; तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील.
Explore यशया 41:11
4
यशया 41:9
मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”
Explore यशया 41:9
5
यशया 41:12
तुझ्याशी लढणार्यांना तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत; तुझ्याशी युद्ध करणार्यांचा नायनाट होईल.
Explore यशया 41:12
6
यशया 41:14
हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.
Explore यशया 41:14
7
यशया 41:8
माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना
Explore यशया 41:8
8
यशया 41:18
मी उजाड टेकड्यांवर नद्या व खोल दर्यांतून झरे वाहवीन; मी अरण्य पाण्याचे तळे व निर्जल प्रदेश झरे करीन.
Explore यशया 41:18
9
यशया 41:17
दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही.
Explore यशया 41:17
10
यशया 41:4
हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्यांनाही तो मीच आहे.
Explore यशया 41:4
11
यशया 41:19-20
अरण्यात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी व कण्हेर ह्यांची लावणी करीन व रानात सुरू, देवदारू व भद्रदारू एकत्र लावीन. येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे; इस्राएलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे.
Explore यशया 41:19-20
Home
Bible
Plans
Videos