1
इब्री 11:1-2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती.
Compare
Explore इब्री 11:1-2
2
इब्री 11:6
आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.
Explore इब्री 11:6
3
इब्री 11:3
विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही.
Explore इब्री 11:3
4
इब्री 11:8-9
अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’ परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्यात त्याची वस्ती होती.
Explore इब्री 11:8-9
5
इब्री 11:7
तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.
Explore इब्री 11:7
6
इब्री 11:5
हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि ‘तो सापडला’ नाही; ‘कारण त्याला देवाने लोकांतरी नेले;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, ‘तो देवाला संतोषवीत असे;’
Explore इब्री 11:5
7
इब्री 11:4
विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.
Explore इब्री 11:4
8
इब्री 11:11
वयोमर्यादेपलीकडे असताही सारेलादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली [व ती संतान प्रसवली], कारण तिने वचन देणार्यास विश्वसनीय मानले.
Explore इब्री 11:11
9
इब्री 11:10
कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.
Explore इब्री 11:10
10
इब्री 11:24-27
‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.
Explore इब्री 11:24-27
11
इब्री 11:17
‘अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले;’ ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राचे’ अर्पण करत होता
Explore इब्री 11:17
12
इब्री 11:31
राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्यांबरोबर तिचा नाश झाला नाही.
Explore इब्री 11:31
13
इब्री 11:29
जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले.
Explore इब्री 11:29
14
इब्री 11:30
विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्या घालण्यात आल्यावर ते पडले.
Explore इब्री 11:30
15
इब्री 11:28
त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्याने’ त्यांना शिवू नये.
Explore इब्री 11:28
16
इब्री 11:22
योसेफाने मरतेवेळेस इस्राएलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली.
Explore इब्री 11:22
17
इब्री 11:21
याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’
Explore इब्री 11:21
18
इब्री 11:20
इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणार्या गोष्टींविषयीसुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला.
Explore इब्री 11:20
Home
Bible
Plans
Videos