1
यहेज्केल 37:4-5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका : प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल.
Compare
Explore यहेज्केल 37:4-5
2
यहेज्केल 37:6
मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”
Explore यहेज्केल 37:6
3
यहेज्केल 37:3
मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.”
Explore यहेज्केल 37:3
4
यहेज्केल 37:1-2
परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या. त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले तेव्हा पाहा, त्या खोर्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या; त्या अति शुष्क होत्या.
Explore यहेज्केल 37:1-2
5
यहेज्केल 37:7-8
मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला; मी संदेश देत असता आवाज झाला; आणि पाहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास अगदी नव्हता.
Explore यहेज्केल 37:7-8
Home
Bible
Plans
Videos