1
१ करिंथ 15:58
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2
Compare
Explore १ करिंथ 15:58
2
१ करिंथ 15:57
परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो.
Explore १ करिंथ 15:57
3
१ करिंथ 15:33
फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”
Explore १ करिंथ 15:33
4
१ करिंथ 15:10
तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेने केले.
Explore १ करिंथ 15:10
5
१ करिंथ 15:55-56
“अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे
Explore १ करिंथ 15:55-56
6
१ करिंथ 15:51-52
पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.
Explore १ करिंथ 15:51-52
7
१ करिंथ 15:21-22
कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील
Explore १ करिंथ 15:21-22
8
१ करिंथ 15:53
कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे.
Explore १ करिंथ 15:53
9
१ करिंथ 15:25-26
कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.
Explore १ करिंथ 15:25-26
Home
Bible
Plans
Videos