1
उत्पत्ती 11:6-7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही. चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
قارن
اكتشف उत्पत्ती 11:6-7
2
उत्पत्ती 11:4
मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”
اكتشف उत्पत्ती 11:4
3
उत्पत्ती 11:9
म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
اكتشف उत्पत्ती 11:9
4
उत्पत्ती 11:1
त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती.
اكتشف उत्पत्ती 11:1
5
उत्पत्ती 11:5
परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले
اكتشف उत्पत्ती 11:5
6
उत्पत्ती 11:8
अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले.
اكتشف उत्पत्ती 11:8
الصفحة الرئيسية
الكتاب المقدس
خطط
فيديوهات