1
मत्तय 18:20
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात, तेथे त्यांच्यामध्ये मी असतो.”
قارن
اكتشف मत्तय 18:20
2
मत्तय 18:19
मी आणखी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल
اكتشف मत्तय 18:19
3
मत्तय 18:2-3
तेव्हा त्याने एका लहान मुलाला घेऊन त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमचे परिवर्तन होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही.
اكتشف मत्तय 18:2-3
4
मत्तय 18:4
म्हणजेच जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय.
اكتشف मत्तय 18:4
5
मत्तय 18:5
तसेच जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.
اكتشف मत्तय 18:5
6
मत्तय 18:18
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल, ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
اكتشف मत्तय 18:18
7
मत्तय 18:35
म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण स्वतःच्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”
اكتشف मत्तय 18:35
8
मत्तय 18:6
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, हे त्याच्या हिताचे आहे.
اكتشف मत्तय 18:6
9
मत्तय 18:12
तुम्हांला काय वाटते? एका माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर टेकडीवर चरत असलेल्या नव्याण्णव मेंढरांना सोडून जे एक भटकले आहे त्याला शोधायला तो जाणार नाही काय?
اكتشف मत्तय 18:12
الصفحة الرئيسية
الكتاب المقدس
خطط
فيديوهات