1
योहान 5:24
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मी तुम्हांला खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय केला जाणार नाही, त्याने मरणातून जीवनात प्रवेश केला आहे.
አወዳድር
{{ጥቅስ}} ያስሱ
2
योहान 5:6
येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, “तुझी बरे होण्याची इच्छा आहे काय?”
3
योहान 5:39-40
तुम्ही धर्मशास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हांला शाश्वत जीवन प्राप्त होईल, असे तुम्हांला वाटते. ते माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. तरी पण शाश्वत जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुमची इच्छा नाही.
4
योहान 5:8-9
येशू त्याला म्हणाला, “ऊठ, तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.” लगेच तो माणूस बरा झाला व त्याचे अंथरुण उचलून चालू लागला. हे घडले तो दिवस साबाथ होता.
5
योहान 5:19
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्याच्यावाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही; कारण जे काही पिता करतो, ते पुत्रही तसेच करतो
Home
Bible
Plans
Videos