1
योहान 11:25-26
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
येशूने तिला म्हटले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल. आणि जिवंत असलेला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो कधीही मरणार नाही, असा तुझा विश्वास आहे का?”
አወዳድር
{{ጥቅስ}} ያስሱ
2
योहान 11:40
येशूने म्हटले, “तू विश्वास ठेवलास तर देवाचे वैभव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का?”
3
योहान 11:35
येशू रडला.
4
योहान 11:4
ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.”
5
योहान 11:43-44
असे बोलून झाल्यावर त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजर, बाहेर ये!” तेव्हा मृत मनुष्य बाहेर आला. त्याचे हातपाय कापडाने बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने लोकांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
6
योहान 11:38
येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर शिळा ठेवलेली होती.
7
योहान 11:11
हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.”
ቤት
መጽሐፍ ቅዱስ
እቅዶች
ቪዲዮዎች