मत्तय 6:16-18

मत्तय 6:16-18 VAHNT

“जवा तुमी उपास करसान, तवा कपटी लोकायसारखी तुमच्या तोंडावर उदाशी नसली पायजे, कावून कि ते स्वताले दुखी दाखवतात, ह्या साठी कि लोकायन त्यायले उपास करणारे लोकं समजावं, जसं कपटी लोकं सभास्थानात अन् गल्ल्याईत करतात, ह्या साठी कि लोकं त्यायची वाह-वाह करे. मी तुमाले खरं सांगतो कि, त्यायले आपलं प्रतिफळ भेटून गेलं हाय, ज्यायनं लोकायची बढाई घेतली. पण जवा तू उपास करशीन तवा आपल्या डोक्शावर तेल लावं, अन् तोंड धून घे. यासाठी कि लोकं नाई, पण तुमचा स्वर्गीय बाप जो गुप्त जाग्यावर हाय, तुले उपासी समजीन, व तुले सगळ्या समोर प्रतिफळ देईन.”